मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

श्री गणेशा



कथा - पटकथा - संवाद
आपण ह्या ब्लॉग वरून चित्रपट कथा पटकथा आणि संवाद लेखणाचे  तंत्र जाणून घेणार आहोत.
अभ्यासू मित्रांनी याचा लाभ घ्यावा.

श्री गणेशा
     
  श्री गणेशा करतांना काही आत्म परीक्षणाची गरज आहे. चित्रपट क्षेत्राच जे आकर्षण आपणास आहे ते कितपत योग्य आहे ? आपल्या आंत आपल्या विचार प्रक्रियेत आपल्या  कल्पना शक्तीला हा भार पेलणार आहे का ? आपल्या मेन्दु मध्ये हे सॉफ्ट वेअर आहे का ?
  आपणास जन्मा सोबत आई वडिलांच्या कडून शरीर, आणि  सोबत काही मानसिक गुणसूत्र हि मिळालेली असतात. कदाचित असेल पण मागील जन्माचे संस्कार हि आपल्यावर येत असावेत ? ह्या सर्वातून आपल्या क्षमता तयार होतात. आपणास खरोखर चांगली कथा सुचते का ? आपल्याला सुचलेली कथा कुणाला आवडते का ? आपले मित्र परिजन कधी कधी आपणास मन राखण्यासाठी खोटच बोलतात,
"अरे वा छान कथा आहे तुझी ! "
"तू ह्याच चित्रपट बनवच !"
"तू उद्याचा स्टीवन स्पीलबर्ग च आहेस !" काय बोलतील याचा नेम नाहीच, पण त्याची अभिरुची कितपत प्रगल्भ आहे ? त्याचा अनुभव काय ? यावर त्याच्या वक्तव्याचा आपण विचार करावा. खूप वाचन कराव. खूप चित्रपट पाहावेत. आपल्या कथांनां कल्पनेच्या चित्रपट रुपात पाहून तारतम्याने विचार करावा. ह्या साठी आपल्याला आपला तिसरा डोळा वापरायचा असतो, अर्थात, प्रेक्षकांच्या नजरेतून बघता आले पाहिजे.
ह्याचे महत्वाचे कारण असे आहे की, ज्यांना चित्रपट बनवता येत नाही ते जर गप्प बसले तर खूप दर्जेदार चित्रपट तयार होतील. कमी बनतील पण चांगले बनतील. जे प्रेक्षकांना खूप  रंजक असे अनुभव देतील. आजकाल खुपदा प्रेक्षकांची फसवणूक होते, ते ज्या अपेक्षेने थिएटर मध्ये जातात आणि तोच तोच लेबल बदललेला मसाला पाहून हैराण होतात . आणि चित्रपट गृहात कधीही न जाण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय फार काळ टिकणारा नसेल पण तो चित्रपट व्यवसायाला निश्चितच घातक आहे.
तसेच आपली योग्यता नसतांना ह्या क्षेत्रात आलात तर तुम्हालाही तुमचे ध्येय गवसणार नाही. उलट कुणाच्या तरी मार्गात तुम्ही अडथळा ठरू शकाल.
तर आपल्या आंत ती क्षमता आहे अशी खात्री झाली कि मग हवी आहे ती प्रचंड अभ्यासाची जिज्ञासा. कथा हा सर्व उत्कृष्ट चित्रपटांचा आत्मा आहे. पाया आहे. ज्यावर एका उत्कृष्ट सिनेमाची बिल्डींग उभी करायची आहे ती जमीन म्हणजे कथा. त्यात नाविन्य असायला हवं. ती मनाला थेट भिडणारी असावी. सिनेमाच्या उंचीचा भार तोलणारी असावी. आणि ती बनवणारा लेखक तितक्याच क्षमतेचा असायला हवा.
खूप वाचन हा एकमेव मार्ग आहे चांगला लेखक होण्याचा.

वाचन
खूप वाचन हा एकमेव मार्ग आहे चांगला लेखक होण्याचा. कारण वाचन ही खऱ्या अर्थाने सृजनशील creative काम आहे. तुम्ही जेव्हा वाचन करीत असता तेव्हा स्वत:शी लक्षपूर्वक पहा तुमच्या मनात काय चाललेले असते ? जे तुम्ही वाचत असता ते दृश्य रूपाने मन:चक्षु in your mind समोर तुम्हाला दिसत असते. लेखकाने लिहिलेलि माहिती तुम्हाला फक्त मदत करीत असते.
उदा. तुम्ही वाचत आहात की, “शाम जिना चढून वरच्या खोलीत गेला.” तुमच्या मनात गोल लोखंडी जिना आला असेल ! पण लेखकाने लिहितांना सरळ, लाकडी, जिण्याची कल्पना केली असेल. अश्या प्रकारे लेखकान केलेला संपूर्ण विचार तुमच्या मनात जसाच्या तसा येत नाही. तो तुमच्या डोक्यातल्या काही कल्पनाचा आधार घेत घडत असतो. आणि हळूहळू तुमच्या आतला लेखक घडवत असतो. एकदा तुमच्या आतील सृजनशीलता (creativity) कार्यान्वित (activate) झाली कि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तुमची वेगळी दृष्टी (vision) मिळू लागते. तुम्ही एखादा सिनेमा बघता, तुम्हाला वाटते की हा सीन आवश्यक नव्हता. हा सीन थोडा नंतर दाखवला असता तर प्रेक्षकांना खिळवून ठेवता आल असत. अस आतून सुचण सृजनशीलतेच लक्षण आहे. पण -
पण ही फक्त सुरुवात आहे. आपण बालवाडी म्हणू यात. म्हणजे काय आहे की तुम्हाला शिकण्याची इच्छा निर्माण झाली आहे. आता तुम्ही  प्रत्येक अनुभव वाचणा सारखा सृजनशील (creatively) रीतीने घेवू लागता. रस्त्याने दिसणाऱ्या साध्या घटनाही तुम्ही बारकाईने बघता. त्याच आतल्या आत वर्णन करू लागता. त्यात एक नाट्य बघू लागता. आता तुम्हाला बाराखडी शिकली पाहिजे. आता आपण इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला पाहिजे.

निरीक्षण
वाचन हा एकमेव मार्ग आहे चांगला लेखक होण्याचा. वाचन तुमची कल्पना शक्ती वाढवत. त्याच प्रमाणे तुमची निरीक्षण शक्ती हि वाढवत. तुम्ही वाचून अनुभवलेलं मन:चक्षुंनी पाहिलेलं, जसच्या तसं किंवा मिळत जुळत काहीतरी प्रत्यक्षात दिसत, तेव्हा तुम्ही त्यातले बारकावे निरखून पाहाता. अशी तुमची  निरीक्षण क्षमता वाढीस  लागते .  
समजा तुम्ही एक एक्सिडेंन्ट  संबंधी खूप छान वर्णन वाचलं आहे. आणि दोन चार दिवसातच तुम्हाला रस्त्या वर एक एक्सिडेंन्ट झालेला दिसला. तुम्ही त्या वाचलेल्या वर्णनाशी पहात असलेल्या दृश्याशी तुलना करता. दोन्ही अनुभवातून एक नवीन दृश्य तुमच्या मनात तयार होत जात.
मग हळूहळू अश्या बऱ्याच गोष्टी तुमच मन संग्रहित करायला सुरुवात करत. नाट्यपूर्ण दृश्यांची एक लायब्ररी तुमच्या अंतर्मनात तयार होत जाते. हि लायब्ररी तुमच्या लेखन जीवनाची शिदोरी आहे. ह्या बद्दल आपण पुढे बोलू. वाचनातून आणि निरीक्षणातून आपली हि शिदोरी आपल्याला ठासून भरून ठेवता आली पाहिजे.
रत्याने चालणारी माणसे, कशी चालतात ? त्यांची लकब कशी आहे ? ती का  असावी ? बोलण्याची ढब कशी आहे आणी  का असावी ? आपल्या नातेवाईकां मध्ये घडणाऱ्या घटना ! ऐकिवात येणाऱ्या घटना ! वर्तमान पत्रातील घटना ! टीव्ही न्यूज ! इंटरनेट ! अनंत मार्गाने अनंत दृश्य आपल्या भोवती प्रवाहित होत असतात. आपल्या अंतर्मनाने त्या टिपून घेतल्या पाहिजेत. ऐनवेळी त्या कश्या उपयोगात आणायच्या ते आपण पुढे पाहू.
पण निरीक्षणातून तुम्ही जतन करून ठेवलेल्या सर्व गोष्टी हा तुमचा अमुल्य खजिना ठरणार आहे. प्रत्येक निरीक्षण हे तुम्ही खरेदी करून ठेवलेली रिअल प्रापर्टी आहे. तुम्ही या जमिनीवर कधीही  चित्रपटाची बिल्डींग उभारू शकता.

चित्रपट पाहण्याची कला
चित्रपट पाहतांना इतर प्रेक्षकां सारखा तो एन्जॉय करणे चित्रपट लेखनात तितकेसे मदत करणारे ठरणार नाही.
चित्रपटाची कथा कशी होती ? हीच कथा आणखी वेगळ्या प्रकारे मांडता आली असती का ? कोणत्या प्रकारे मांडली असती तर ती जास्त परिणाम कारक झाली असती ? सिनेमाची गती कुठे मंदावली का ? आणि का ? तो सीन महत्वाचा नव्हता कि परिणाम कारक झाला नाही म्हणून तसे वाटते ? चित्रपटातील पात्र (characters) परिणाम कारक होती का ? त्यात विविधता होती का, की ती एकसुरी होती ? प्रमुख पात्र (Hero) चे ध्येय (want) काय होते  ?  त्याच्या ध्येयाच्या मार्गात अडथळे (villain) काय होते ? त्यांच्यातला संघर्ष (conflict) रोमांचक होता का ? हा संघर्ष उच्च  टिपेला  (climax)पोहोचला का ? ह्या महत्वाच्या घटकांचा सविस्तर विचार लेखकान करायला हवा. एक खरोखर चांगला असलेला सिनेमा तुम्हाला ह्या कामात अडचणी आणू शकतो.
चित्रपट जितका उत्कृष्ट असेल तितका तो तुम्हाला निरीक्षणाच कार्य करू देणार नाही. सिनेमा उकृष्ट म्हणजे तो त्याच्या भावना वेगात तुम्हाला वाहवून नेण्यात तो बलवत्तर ठरतो. तुम्ही  निरीक्षण करता करताच त्यातील दृश्यामध्ये हरवून जाता, मधेच तुम्हाला भान येते कि त्या ठिकाणी ते पात्र नेमके काय बोलले होते ? अमुक वेळेला अमुक ठिकाणी पाठीमागे कोण होते ? किंवा असेच काहीतरी आणि मग तूम्ही पुन्हा निरीक्षणाला सुरुवात करता . असे चित्रपटच तुमच्या लेखण क्रियेला मदत कानार आहेत. असेच चित्रपट आपण पुन्हा पुन्हा पहावयाचे आहेत. आणि ते अश्या पद्धतीने पाहायचे आहेत. अश्या दोन चार चित्रपटांचा अभ्यास त्याच्या स्क्रीनप्ले सोबत करणे खूप फायद्याचे ठरते. म्हणजे स्क्रीनप्ले मधून एक सीन वाचायचा, मनाशी विचार करायचा कि हा सीन पडद्यावर कसा दिसेल ? आणि मग तो प्रत्यक्ष पाहावा. स्क्रीप्ले मधल्या लिहिलेल्या शब्दांचा अर्थ पडद्यावर कळतो. लिहिलेले शब्द म्हणजे दिसणारे दृश्य असते. स्क्रीनप्ले ची भाषा आणि त्या भाषेचे व्याकरण जरा जरा कळू लागते. आणि इतर लिखाणापेक्षा (कथा कादंबरी नाटक ) स्क्रीनप्ले लिखाण कस वेगळ आहे हे उमगायला लागत. पटकथा संवाद लेखण शिकण्याची खरी सुरुवात होते.

नाट्यपूर्ण अनुभवांची भेळ  
वाचनातून, निरीक्षणातून, उत्कृष्ट चित्रपटातून आपण बरेच चांगले अनुभव मिळवलेत. पण ते आपणास चागला लेखक बनवण्यास नक्कीच कमी पडतील. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सगळे अनुभव वापरलेले आहेत, खूप लोकांनी ते पाहिलेले किंवा वाचलेले आहेत. आपण निरीक्षणातून मिळवलेले अनुभव सुद्धा कच्चा माल (Raw material ) आहे. लिखाण सुरु करण्या आधी लेखका कडे अनुभवांचा अफाट खजिना असायला हवा. ह्या विश्वात अनंत गोष्टींचा अनंत विस्तार आहे. विचार करा आपण किती झाडं पाहिली असतील ? उत्तर नक्कीच न मोजता येणार असेल ! तुम्ही हे सुद्धा खात्रीशीर पणे सांगाल कि कोणतीही दोन सुद्धा एकसारखी नव्हती. कधीही कोणतेही दोन माणस तंतोतंत एकसारखी नसतात. जुळे भावंड ही तंतोतंत सारखे नसतात असले तरी स्वभावाने वेगळे असणारच. विविध अनुभवांनी स्वत:ला समृद्ध करणे हेच लेखकाचे पहिले प्रशिक्षण आहे.
दुसरी गोष्ट ह्या अनुभवांशी करावयाची असते ती अशी की, ह्या सर्व अनुभूतींना वेगवेगळे लक्षात ठेवायचे नाही. खरे पाहता ते शक्य नाहीच, पण तरीही कधी कधी हे कठीण काम करावयास आपले मन आपणास भाग पाडते. आपण हे विसरून जावू कि काय ? हा प्रश्न आपणास भेडसावतो. आणि आपण हा दुर्घट प्रयोग करू लागतो. त्यात आपली खूप सारी उर्जा वाया जाते असे मला वाटते. ह्या उलट ह्या सर्व अनुभवांची आपल्या मनामध्ये सरमिसळ झाली पाहिजे. ह्या सर्व अनुभवाच्या फापट पसार्याचे यथा योग्य रसग्रहण व्हायला पाहिजे. साध्या भाषेत पचन झाले पाहिजे. ह्यामुळे होते काय की, प्रत्येक प्रसंग वेगळा आठवला नाही तरी त्याचा परिपाक आतून (unconsciously) काम करतो. ह्या प्रकारे अंतर्मनातून आलेले वर्णन प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेवू शकते.
आपल्या अनुभवाची हि सरमिसळ आणखी एका प्रकारे उपयोगी पडते ती अशी, आपल्या स्मृतीतला एक अनुभव दुसऱ्या अनुभवा सोबत जुळतो आणि एक वेगळ परिणाम कारक रसायन हाती लागत.
उदा- आपण ऐकलेला एखादा खुनाचा प्रयत्न आणि बर्याचदा येणारा  मिसकॉल चा  आपण समन्वय केला. एखाद्या ठिकाणी खून होतो आहे आणि नेमका तिथेच कुणाचा तरी मिसकॉल येतो. हा फोन कुणाचा यावर खुनी घाबरतो. अश्या प्रकारे एखाद्या नाट्यपूर्ण प्रसंगाची निर्मिती होवू शकते.
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की सगळे अनुभव विसरून जावेत. काही महत्वाच्या घटना लक्षात ठेवणे गरजेचे आहेच. पण त्या सर्वांची सरमिसळ करणही तितकाच आवश्यक आहे.
नाट्यपूर्ण अनुभवांची ही भेळ आपल्या लिखाणाला आगळी वेगळी लज्जत आणल्या शिवाय राहणार नाही.

भूक  
आपणास जश्या काही शारीरिक गरजा असतात. भुक तहान इ. तश्याच काही मानसिक गरजा असतात. त्यातली एक अक्राळ विक्राळ भूक असते कहाणी ची भूक ! आपण सदा सर्वदा कुठल्या ना कुठल्या कथेचा भाग असतो. आपल्या भोवतालचा प्रत्येक माणूस काहीना काही गोष्ट घडवीत असतो. तुम्ही गप्पा करतांना लक्ष देवून ऐका प्रत्येक जण काहीतरी बोलण्यासाठी धडपडत असतो. सकाळी ओंफीस ला येतांना अस अस घडलं ! बायको पाय घसरून पडली आणि अमुक टमुक  झालं ! मुलाच्या शाळेत घडलेली ! मित्राच्या घरी घडलेली ! कुणाच्या जन्माची ! कुणाच्या मरणाची ! कुणी मरता मरता वाचल्याची ! अनेक ! अनंत कथा सदैव आपण ऐकत असतो आणि सांगत असतो. आणि हे सुद्धा अपूर पडत की काय आपण झोपेतही कथा अनुभवतोच ……… आपण स्वप्न पाहतो.
आपल्याला टी व्ही अपुरा पडतो, आपण ब्रेक मधेही  लगेच दुसऱ्या चैनेल वर जातो.सीडी डीव्हीडी मोबाईल वर आय पॉड आणि काय काय साधन आपण निर्माण केलीयेत कहाणीचा अनुभव घेण्यासाठी ?  सिनेमा गृहे आताश्या जर ओस पडलीयेत पण तरीही शंभर करोडचा बिझिनेस होतोच ! माणसाला कहाणीच्या अनुभवाची नितांत गरज आहे.
हे अस  का  होत ? का माणूस सदा सर्वदा कोणत्या तरी कहाणीचा भाग असतो. ? कारण असं आहे कि कथा ही माणसाच्या जगण्याच अविभाज्य साधन आहे. कथा आपल्याला बौद्धिक आणि भावनिक खाद्य पुरवते. ह्यात कथेतून आपली बौद्धिक भूक फार कमी प्रमाणात पूर्ण होते, पण भावनिक भूक फार मोठ्या प्रमाणात भागते. किंबहुना भावनिक भूक भागवण्या साठीच आपल्याला कथा अनुभवावी लागते.
अतिशय महत्वाची गोष्ट चित्रपट कथा लिहिणाऱ्या लेखकाला लक्षात घ्यायला हवी ती हीच की आपल्या कथेतून श्रोत्यांची किंवा प्रेक्षकांची भावनिक भूक भागवता आली पाहिजे.
ह्यात एक बारकावा लक्षात घेण्या सारखा आहे कि आपणास असे वाटेल माणसाला आनंदित व्हायला आवडेल, रोमांटिक व्हायला आवडेल ! आणि अश्या काही छान छान सुखी समाधानी गोड गोड अनुभवच माणसाला आवडतील. पण कथेच्या बाबतीत असे नाही. कथेत माणसाला त्याच्या अभिरुची नुसार कमी जास्त पण सगळेच अनुभव घ्यायला आवडतात. त्याला घाबरायला ही आवडत ! त्याला संकटात पडायलाही आवडत ! त्याला धोक्याच्या , प्रसंगी मरणाच्या जवळून जायलाही आवडत !
महत्वाच कारण अस आहे  की, कथा खोटी असते ! जे काही होणार आहे ते कागदावर आपल्यासाठी पडद्यावर होणार असत. जे अनुभव खऱ्या जगण्यात घेता येत नाहीत तेच माणसांना चित्रपटात घेता येतात. आणि हे होण्यास त्यांना मदत कारण हेच कथा लेखकच काम होवून बसत. अश्या कथांचा शोध कसा घ्यावा ?

चित्रपट लेखकाचे ध्येय  
चित्रपट लिखाणास सुरुवात करतांनाच लेखकाला आपले ध्येय निश्चित करावयास पाहिजे. साधारणत: नवोदित लेखक एखाद्या सुपर हिट चित्रपटाने झपाटलेला असतो. त्या चित्रपटाच्या यशाला पाहून मोहात पडलेला असतो. त्यातल्या सारखे दिसणारे, वागणारे पात्र योजना, त्या कथेशी मिळती जुळती कथा, किंवा कथेचा विषय इ.
हे करण्यात  कदाचित व्यावसाईक यशाचे गणित जुळते पण ते एक मर्यादित यशच फक्त देवू शकते. ह्याप्रकारे केलेल्या कलाकृतीला अद्वितीय यश किंवा मान्यता मिळू शकत नाही. प्रतिथ यश म्हणजे सुपरहिट चित्रपटांच्या पावलावर पाऊल टाकून तयार केलेल्या चित्रपटांचा इतिहास पाहिला तर हे सहज लक्षात येईल.
त्यामुळे सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावयाची ती ही की, आपण स्वत;ला अनुकरण करण्यापासून वाचवावे. अति उत्तम अनुकरण सुद्धा कधीही सृजनशील(creative) असू शकत नाही.
मग नव्या चित्रपट लेखकाने काय करावे ? तर ह्या सुपरहिट चित्रपट मधून हा अभ्यास करावा की ह्या लेखक किंवा दिग्दर्शकाने कश्या प्रकारे नाविन्याचा शोध घेतला आणि तो काय काय करून परिणाम कारक बनवला. त्या पद्धतीने आपणही आपल्या आसपास निरीक्षणातून लोकांच्या जीवाभावाचे विषय शोधावेत. वेगवेगळे कथासूत्र चर्चा करून सामान्य माणसांची रुची ओळखता येवू शकते. लहान मुलही ह्या बाबतीत खूप मदत करू शकतात. मुलांना आपल्या मनातली गोष्ट सांगावी (अर्थात मुलांच्या योग्य असेलतर) मुल जर कुतूहलाने भरून जात असतील तर ती गोष्ट परिणाम कारक आहे असे मानण्यास हरकत नाही. अश्या विविध प्रकारे आपला विषय नक्की करावयाचा असतो.
चित्रपट लेखकाच कार्य इतर लेखकापेक्षा बऱ्यापैकी खडतर असत. सर्व साधारण कथा कादंबरी इ. लेखकांच लिखाण सरळ सरळ वाचकाच्या हातात जात, आणि आपला परिणाम साधत. पण चित्रपट लेखकाची संहिता कुणी वाचत नाही, वाचू शकत ही नाही. सामान्य वाचकाला ती समजणार ही नाही. येथे त्या संहिते वरून तयार झालेला चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येतो. ज्याच्यावर अनेक जणांनी आपले संस्कार केलेले असतात. दिग्दर्शकाने सांगितल्या प्रमाणे अभिनेते काम करतात. पण सारे अभिनेते आपापली छाप सोडून जातातच. वेशभूषा रंगभूषा कर आपापले संस्कार करतात. हे सारे छाया चित्रकार आपल्या तऱ्हेने चित्रित करतो. एडिटर आपले संस्कार करतो आजकाल व्ही एफ एक्स आणि कम्प्युटर ग्राफिक्स इ. अनेक संस्कार होतात. त्यानंतर लेखकाची कलाकृती प्रेक्षकाच्या समोर जाते. ह्या सर्वांचे संस्कार काय होतील ह्याचे भान ठेवून लेखकाला लिहायचे असते. आणि हा प्रकार बर्यापैकी कल्पनेला त्रासवणारा , शीण आणणारा असतो.

४२ टिप्पण्या:

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. माझ्याकडे एक उत्कृष्ट कथा आहे आणि मी पण सिनेमा बनु इच्छित आहे कृपया मार्गदर्शन कराल का ?

    उत्तर द्याहटवा
  3. Dear Dr Sir

    दंडवत प्रणाम

    मी आपला ब्लोग पूर्ण वाचन केला आहे खुपच छान माहिती पोहचवाली आहे. आपले मी आभार मांडतो आहे. धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  4. सर जी मला आपली मदत हवि आहे माझी कथा सत्यात ऊतरवण्यासाठी प्लिज सर

    उत्तर द्याहटवा
  5. सुंदर विवेचन. मनःपुर्वक धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  6. सर खुपच छान माहीती दिलेली आहे आपण...

    उत्तर द्याहटवा
  7. सर मी दोन हिरो असणारी कथा लिहितोय मला निगेटिव्ह कॅरॅक्टर सापडत नाही , मदत कराल का

    उत्तर द्याहटवा
  8. सर माझ्याकडे चांगली उत्कृष्ट लवस्टोरी मी पण सिनेमा बनवू इच्छितो कृपया मार्गदर्शन करा.
    Plz सर

    उत्तर द्याहटवा
  9. माहिती खूप छान आहे. धन्यवाद ----- अजून माहिती साठी काय करावे सर , कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

    उत्तर द्याहटवा
  10. खूप चांगली माहिती दिली आहे.धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा
  11. सर मी कन्या हत्येवर एक कथा लागली आहे

    उत्तर द्याहटवा
  12. तशी ही माहिती खुप चांगली आहे पण त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे..

    उत्तर द्याहटवा
  13. तशी ही माहिती खुप चांगली आहे पण त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे..

    उत्तर द्याहटवा
  14. सर मला ग्रामीण प्रेमकथा चित्रपटात दाखवायची आहे. हेच माझ आयुष्याच धेय आहे. 8975058693

    उत्तर द्याहटवा
  15. सर मला एका गरीब कुंटुबातील युवक स्वकतृत्वावर कशी गरूड झेप घेतो याबद्दल छान कथानक लिहीत आहे परंतु मला पटकथा लिहण्याची पध्दत माहीत नाही तर मला सहकार्य करावे.

    उत्तर द्याहटवा
  16. छान खूपच उपयुक्त माहिती आहे , माझ्याकडे खूप कथा आहेत ,त्यातील 10 ते 12 कथा अश्या आहेत ज्यावर छान मराठी चित्रपट बनवता येईल ,मी छान पटकथा संवाद लिहून देऊ शकतो ,तरी इच्छुक मान्यवरांनी दखल घ्यावी
    9822753842
    शिरसाट भगवान पुणे

    उत्तर द्याहटवा
  17. I am a writer. I have done one film marathi screen play dilouge and plenty of album marathi

    उत्तर द्याहटवा
  18. मि विश्वनाथ केदारे एक व्याख्याते म्हणुन महापुरुषाच्या
    जिवनावरील प्रकाश टाकण्याच काम करतो आहे.
    सर मला पण चित्रपट कथा लिहीण्याची खुप आवड आहे.
    पण ती कथा नेमकी कशी लिहावी यासंबधी आपण मला मार्गदर्शन कराल?
    पत्ता: हिवरा खु
    ता: वसमत जिल्हा: हिंगोली
    मो नं7507629034

    उत्तर द्याहटवा
  19. नमस्कार सर,मी सनिल पाटील. मी एक मराठी चित्रपट कथा(रहस्यमयी कथा) लिहिली आहे.मला काही मार्गदर्शन कराल का?
    मोबाईल नंबर.९०२८५४०७३२

    उत्तर द्याहटवा
  20. आपण दिलेली माहिती फारच मोलाची आहे
    मला पटकथा लिहायची आहे त्यासाठी मला आपण काही मुद्दे माझ्या पर्सनल मो,नंबर द्याल अशी आशा बाळगतो9011152179

    उत्तर द्याहटवा
  21. नवीन लेखकाला खर्या अर्थाने खूपच प्रेरणा देणारी आहे
    माझ्याकडे रजिस्टर स्क्रिप्ट आहे लेखक गीतकार मीच आहे पण प्रोडयूसरची गरज आहे कुणी असल्यास जरूर कळवा
    फोन नं 8459191405

    उत्तर द्याहटवा
  22. खूपच सुंदर....कथा, पटकथा याचा मूळ गाभा किती योग्य असावा,व त्यानुसार चित्रपटाची पोत उच्च पातळीची होते,हे अगदी सखोल वैचारिक पातळीवर समजवून सांगितले.मुख्य म्हणजे कथे मध्ये एक उत्कंठा विषय प्रधान आविष्कार असेल,तरच ती कथा त्या चित्रपटाला एक विशिष्ठ
    दर्जा प्राप्त करून देता येते,हे उघड सत्य आहे...
    धन्यवाद..

    उत्तर द्याहटवा
  23. सर उत्तम चित्रपटांच्या पटकथा पीडीएफ मध्ये मिळू शकतील का..?

    उत्तर द्याहटवा
  24. सर मी एक चित्रपट लेखक बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर मला तुमचं आणि चित्रपट लेखकाचे मार्गदर्शन मिळू शकते का ?

    उत्तर द्याहटवा
  25. साहेब,मी लहानपणापासून काही ना काही लिहीत आलो आहे.1992/93ला मी *सिर्फ तुम * नावाने, एका चित्रपट निर्मात्यांना पाठविली होती.आता सुध्दा चित्रपट कथा लिहिल्या आहेत ,त्या माझ्याकडेच आहेत.लिहायची खूप इच्छा आहे.कल्पना भरपूर आहेत.काय करावे.नाव कमवायचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  26. साहेब.मी कथा (स्कीप्ट ) लिहिली आहे व लिहीत आहे आणि लिहीणार आहे.नाव कमवायचे आहे.कमजोरी आहे ति पैशाची.कृपया समाधानकारक उत्तर दया

    उत्तर द्याहटवा
  27. सर मी एक १०वी चा विध्यार्थी आहे. सर मला लेखन,अभिनयाची आवड आहे. तर मी माझे पुढील शिक्षण कोणत्या कोर्स मधून पूर्ण करावे म्हणजे मला त्याचा माझ्या कलेसाठी उपयोग होईल?

    उत्तर द्याहटवा
  28. मी एक शेतकरी घरातील आहे सिण करण्याची इच्छा आहे

    उत्तर द्याहटवा